जिल्हा परिषद शाळांना वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्याची मागणी

जिल्हा परिषद शाळांना वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्याची मागणी

*कोकण Express*

*जिल्हा परिषद शाळांना वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्याची मागणी…*

*ओरोस,ता.१७:*

जिल्हा परिषद शाळा वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक तात्काळ देण्यात यावे,अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.याबाबतची मागणी जिल्हाध्यक्ष नितीन कदम व सचिन मदने यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता जि प शाळांना द्यावयाच्या वार्षिक सुट्टयांची यादी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांची दिनांक 06/05/2020 रोजी बैठक घेऊन निश्चित केली होती. परंतु कोवीड 19 प्रादुर्भाव आपत्कालीन परिस्थितीचे कारण दाखवून सदरचे परिपत्रक निर्गमित होऊ शकले नव्हते.शासनाच्या निर्देशाप्रमाणे २७ जानेवारी २०२१ पासून इ ५ वी ते ८ वीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले असून इ १ ली ते ४ थी चे वर्ग नजीकच्या काळात सुरू होण्याचे सूतोवाच करण्यात आलेले आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ उर्वरित शालेय दिवसांमध्ये शाळांना द्यावयाच्या किरकोळ सुट्टया या अधिकृतरित्या कळणे आवश्यक आहे. किरकोळ सुट्टयांचे परिपत्रक शाळांना जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत याबाबत विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे.त्यामुळे सदर परिपत्रक शाळांना तात्काळ निर्गमित करण्यात यावे ,अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!