*कोकण Express*
*सिंधुदुर्गात ७१.११ टक्के मतदान*
*सर्वाधिक मतदान कुडाळ -मालवण – ७२.२९ टक्के*
*कणकवली : प्रतिनिधी*
कालच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यांतील 6 लाख 78 हजार 928 मतदारांपैकी 4 लाख 82 हजार 752 मतदारानी म्हणजेच 71.11% टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहीती सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली. यात सर्वाधिक मतदान कुडाळ – मालवण मतदार संघातून 72.29% करण्यात आले तर सर्वात कमी मतदान कणकवली मतदार संघातून 69.55% करण्यात आले आहे तर सावंवाडी मतदासंघांत 71 . 11%इतकं मतदान झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघ, कुडाळ,मालवण मतदार संघ व सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदार संघ या तीन मतदारसंघातील तीन जागांसाठी एकूण 8 मुख्य उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
मतदार संघ निहाय झालेले मतदान 268 कणकवली मतदार संघात एकूण मतदार 2 लाख 31 हजार 740 पैकी 1 लाख 61 हजार 177 मतदारांनी म्हणजेच 69.55% एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघातून एकूण मतदार 2 लाख 17 हजार 186 पैकी 1 लाख 57 हजार 13 मतदारांनी म्हणजेच 72.29% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून एकूण मतदार 2 लाख 30 हजार 2 पैकी 1 लाख 64 हजार 562 मतदारांनी म्हणजेच 71.,11% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला कणकवली विधानसभा मतदार संघातून सर्वात कमी म्हणजेच 69.55% एवढेच मतदान झाले. तसेच जिल्ह्यातील 3 लाख 41 हजार 934 पैकी 2 लाख 33 हजार 241 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर जिल्ह्यातील 3 लाख 36 हजार 991 पैकी 2 लाख 49 हजार 511 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण पुरुषांच्या तुलनेने महिला मतदारांची संख्या अधिक आहे तरी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जादातर पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 96 हजार 176 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.

