*कोकण Express*
*सावंतवाडीत स्कूल बसची पान टपरीला धडक*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिरच्या मागे असलेल्या भिसे उद्यानालगत उभ्या असलेल्या गाडीला बाजू देण्याच्या प्रयत्नात स्कूल बसची धडक पान टपरीला बसली. या अपघातात टपरी चालक जखमी झाला. तर स्कूल बसची काच फुटली मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
याबाबतची माहिती कळताच नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी टपरी चालकाला उपचारार्थ त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.