*कोकण Express*
*कोकणकन्या, तुतारी ,मेंगलोर एक्स्प्रेसने हजारो चाकरमानी निवडणूकीसाठी कोकणात*
*कणकवली : प्रतिनिधी*
कोकणकन्या, तुतारी आणि मेंगलोर एक्स्प्रेसने सकाळ पासून हजारो चाकरमानी निवडणूकीसाठी कोकणात दाखल झाले आहेत.एकट्या कणकवली मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे ४२ टक्के मतदान झाले होते.सायंकाळी सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान होणार असे अनुमान आहे.या सर्व मतदानाची सरासरी पाहता चाकरमान्यांची मते निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावून चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्याने आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत होती.

