*कोंकण Express*
*अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी मतदानाचा अधिकार बजावला**
सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.सावंतवाडी मतदार संघाच्या विकासासाठी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती संदीप घारे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील भालावल येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.