सिटी सर्व्हेतील प्रॉपर्टी कार्ड बांदा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध

सिटी सर्व्हेतील प्रॉपर्टी कार्ड बांदा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध

*कोकण Express*

*सिटी सर्व्हेतील प्रॉपर्टी कार्ड बांदा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध*

*सिटी सर्व्हेतील प्रॉपर्टी कार्ड बांदा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध*

*प्रॉपर्टी कार्ड अद्ययावत करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे*

*भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रियदा साकारे यांचे* आवाहन*

बांदा ः प्रतिनिधी*

बांदा शहरात ३२ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सिटी सर्वेक्षण अंतर्गत दोन हजार २०० प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता उतारे) शासन दफ्तरी नोंद करण्यात आले आहेत. याची सविस्तर यादी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्यात आली असून हे उतारे जमीन मालकांनी अद्ययावत करण्यासाठी स्थावर मालमत्तेचे कायदेशीर अभिलेख सादर करावे असे आवाहन भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकारे यांनी येथे केले.
बांदा शहरातील प्रॉपर्टी कार्ड अद्ययावत करण्यासाठी व ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती साकोरे बोलत होत्या. यावेळी परिराक्षक भूमापक संजय पार्टे, भूकरमापक रवींद्र चव्हाण, सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, श्यामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, प्रतीक्षा सावंत, अंकिता देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!