*कोकण Express*
*महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.येथील काझी शहाबुद्दीन मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.यावेळी त्यांच्या सोबत पत्नी रुजिता तेली, मुलगा सर्वेश तेली उपस्थित होते.
सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार त्यामुळे माझा विजय निश्चित असा दावा त्यांनी यावेळी केला.तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.