*कोकण Express*
*महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क *
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री .संदेश भास्कर पारकर यांनी कणकवली येथील रा..बा.उचले जिल्हा परिषद शाळा नंबर १ तालुका स्कुल येथे कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.यावेळी पत्नी सौ.समृद्धी पारकर, मुलगा सौरभ आणि मुलगी गंधर्वी यांनी हि मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले की, मतदारांचा महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून मतदार मला विजयी करतील.प्रचारादरम्यान मतदारसंघात मतदारांशी संपर्क केला त्यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.असा विश्वास पारकर यांनी केला.