*कोकण Express*
*दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी पल्लवी केसरकर, मुलगी सोनाली केसरकर आणि सिद्धार्थ वगळ उपस्थित होते.मतदान केल्यावर केसरकर कुटुंबियांनी सेल्फी काढून सर्वांना मतदानाचं आवाहन केलं.