जागतिक विक्रमवीर दुर्वांक गावडेचा वागदे गावच्यावतीने सत्कार

जागतिक विक्रमवीर दुर्वांक गावडेचा वागदे गावच्यावतीने सत्कार

*कोकण Express*

*जागतिक विक्रमवीर दुर्वांक गावडेचा वागदे गावच्यावतीने सत्कार….*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील वागदे गावचा आठ वर्षाचा सुपुत्र कु.दुर्वांक गुरुदत्त गावडे याने अवघ्या २ मिनिट ३७ सेकंदात २०० हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा जागतिक विक्रम करत, आपल्या बुद्धिचातुर्य आणि हुशारीची ओळख अख्या जगाला करुन दिली आहे. दुर्वांक हा आपल्या वागदे गावाचा सुपुत्र असल्याने त्यांच्या नावा सॊबतच वागदे गावचे नाव जागतिक स्थरावर पोहचले आहे. त्याच्या या कर्तृत्वाचा अभिमान असल्याचे सामाजिक कार्यकर्ते वैभव काणेकर यांनी सांगत कु.दुर्वांक यांच्या आईवडिलांचे देखील कौतूक केले.

वागदे गावच्या वतीने वागदे गणपती मंदिरात कु.दुर्वांक गावडे याचा सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी दुर्वाकने उपस्थितांना अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत २०० हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता म्हणून दाखवली. यावेळी सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, कणकवली कॉलेजचे प्रा.सत्यवान राणे, निलेश काणेकर, विजय सराफ, ललित घाडीगांवकर, मनीषा गावडे, परेश काणेकर, सुयोग ताटे, गुरुनाथ गावडे, सतीश काणेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!