*१००% शिक्षक कर्मचाऱ्यांचे मतदान असणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा होणार गौरव*

*१००% शिक्षक कर्मचाऱ्यांचे मतदान असणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा होणार गौरव*

 

*कोकण Express*

*१००% शिक्षक कर्मचाऱ्यांचे मतदान असणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा होणार गौरव*

*मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचा पुढाकार*

*राज्यातील शैक्षणिक संस्थांना आवाहन*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना मतदान करताना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शिक्षक चळवळीतील युवा नेते डॉ विशाल कडणे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या शैक्षणिक संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे १००% मतदान होईल अशा शैक्षणिक संस्थांचा आणि संस्थाप्रमुखांचा गौरव करण्याचा निर्धार मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून सर्व शैक्षणिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हि शिक्षकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असते. यंदा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शैक्षणिक संस्थांना १००% कर्मचाऱयांनी मतदान करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने केले आहे. १००% मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करावे अशी विनंती संस्थाप्रमुखांना ट्रस्टच्या माध्यमातून केली आहे. १००% शिक्षक कर्मचाऱ्यांचे मतदान झाल्यानंतर शैक्षणिक संस्थांचा गौरव करण्यात येईल, अशा संस्थानी गौरव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी +९१९५९४०२०८८८ ह्या क्रमांकावर अथवा ishanyamumbaidaivadnyasamaj@gmail.com ह्या ई-मेल आयडीवर आपले नाव आणि माहिती नोंदवावी अशी माहिती ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ विशाल कडणे यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!