*कोकण Express*
*पणदूर ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल*
*ओरोस :*
आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत सन २०१९-२० साठी पणदूर गावची यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जिल्हास्तरावरील ४० लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. यावेळी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होत्या. या दरम्यान सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० अंतर्गत निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरीय सर्व ग्रामपंचायतींना १६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात प्रमाणपत्र वितरीत करून सन्मानित करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता व्यवस्थापन दायित्व अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञान यांचे मूल्यमापन करून त्यांना पुरस्कार देण्याची जिल्हा स्मार्ट ग्राम योजना सन २०१६-१७ पासून सरकारने सुरू केली होती. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला १० लाख, तर जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. योजनेचे आता ‘आर. आर. पाटील जिल्हा सुंदर गाव‘ असे नामकरण करण्यात आले आहे.