*कोकण Express*
*नागवे येथे अजगराला जीवदान*
*कणकवली : प्रतिनिधी*
नागवे येथील मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेश मूर्ती शाळेनजिक रविवारी सायंकाळी आढळलेल्या भल्या मोठ्या अजगरास सर्पमित्र यश वर्दम व औदुंबर पाटील यांनी शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेश मूर्ती शाळेनजिक रविवारी सायंकाळी साफसफाईचे काम चालू होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याव्या सुमारास ७-८ फुटाचा भला मोठा अजगर सागर वर्दम याच्या निदर्शनास पडला.
यावेळी सर्पमित्र सर्पमित्र यश वर्दम व औदुंबर पाटील यांना सदर अजगर पकडण्यासाठी बोलवण्यात आले. सर्पमित्र येई पर्यंत काळोख पडल्याने अजगारास पकड्यास अडचणी येत होत्या. मात्र त्यांनी सदर अजगरास मोठ्या शिताफीने पकडुन येथील नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी अजगरास पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सर्पमित्र यांचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.
साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो उंदीर व किटकापासून पिकाचे संरक्षण करतो. पण ग्रामीण परिसरात सापाबाबत अनेक गैरसमजामुळे साप दिसताच त्यांना ठार मारले जाते. मात्र तसे न करता त्यांना सर्पमित्र यांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे, असे आवाहन केले.
यावेळी अशोक सातवसे, चंद्रकांत सावंत, अजय सावंत, सुरेंद्र दळवी, संतोष तेली, महेश मोरजकर, महादेव मोरजकर, विठोबा हुले, प्रसाद पाताडे, श्री. बागवे, प्रशांत गावकर, सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते.