*कोकण Express*
*सावंतवाडी मतदारसंघातील 310 केंद्रावर कर्मचारी रवाना*
*निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. आज पासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरु केली असून 270 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदार संघातील एकूण 310 मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांना पाठवण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत श्री. हेमंत निकम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांनी नियोजन केले असून निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन व इतर सामुग्री कर्मचाऱ्याऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना पोलिसां सोबत त्यांना नेमून देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. 38 एसटी गाड्या व तीन मिनी बसेसद्वारे या मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील 390 मतदान केंद्रावर हे कर्मचारी रवाना झाले.
सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सकाळपासूनच निवडणुकीसाठी लागणारी सामुग्री, व्हि ईएम मशीन निवडणूक कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल जिल्ह्यातील निवडणूक केंद्रांना भेट देत आहेत. पोलीस महानिरीक्षक संजय दरोडे व पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी जिमखानामैदान येथे सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे इव्हीएम मशीन इतर साहित्य ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण 310 मतदान केंद्र असून 1500 कर्मचारी निवडणुकी निवडणूक प्रक्रियेसाठी घेण्यात आले आहेत. तर पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड मिळून एकूण 600 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी एसटीच्या 38 गाड्या व तीन मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघातून एकूण दोन लाख, तीस हजार, मतदार असल्याची माहिती हेमंत निकम यांनी दिली.