*कोकण Express*
*विकेल ते पिकेल” अभियानांतर्गत भाजीपाला विक्री केंद्र सुरू*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी शनिवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी गावच्या आठवडा बाजार दिवशी आत्मा कणकवलीच्या वतीने “विकेल ते पिकेल” या अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र मधून भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रकल्प उपसंचालक (आत्मा) चे डी. एस. घोलप , उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी हजारे हजारे ,कृषी अधिकारी डी. एम. तोरणे, सहाय्यक व्यवस्थापक आत्मा श्री.व्ही. एम पाटील, चिंचवली गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, खारेपाटण ग्रामपंचयत सदस्य शंकर राऊत, शमशुद्दीन काझी, पर्यवेक्षिका जी. जी. तेली मॅडम, कृषी सहाय्यक पाटील , कृषी सेवक चव्हाण आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या चिंचवली या आदर्श कृषी संपन्न गावातील भाजी पाल्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आवश्यक असणारी सर्व ती मदत केली जाईल. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.