नाडकर्णी नगर महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य – डॉ. अरविंद चोपडे

नाडकर्णी नगर महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य – डॉ. अरविंद चोपडे

*कोकण Express*

*नाडकर्णी नगर महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य – डॉ. अरविंद चोपडे*

*वरवडे आरोग्य उपकेंद्राला कमोड व्हील चेयर प्रदान….!*

*विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली – नाडकर्णी नगर आणि स्वामी समर्थ नगर मधील महिला दरवर्षी गणेश जयंती उत्सवात सामाजिक कृतज्ञता निधी उभारून त्याचा विनियोग सामाजिक कार्यात करतात, हा फार स्तुत्य उपक्रम आहे. असे उदगार वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद चोपडे यांनी काढले. ते महिला मंडळाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिलेल्या कमोड व्हील चेयर स्वीकारताना बोलत होते.

नाडकर्णी नगर, कलमठ आणि स्वामी समर्थ नगर आशिये येथील महिला सन २०१५ पासून संक्रांतीचे हळदीकुंकू सामूहिकरीत्या करतात. प्रत्येकी ठरावीक वर्गणी निश्चित करून हा समारंभ केला जातो. असा एकत्रित हळदीकुंकू समारंभ केल्याने वेळ, श्रम आणि पैसे यांची बचत होते. त्यामुळे उरलेले पैसे सामाजिक काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून गणेश जयंती कार्यक्रमात विविध संस्थांना देण्याचा प्रघात गेली सात वर्षे सुरू आहे.

यावर्षी सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभागातून उभारलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून वरवडे आरोग्य उपकेंद्राला कमोड व्हील चेअर देणगी म्हणून देण्यात आली. तसेच यंदा येथील माघी गणेशोत्सव सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद आदी कार्यक्रम रद्द करण्यात येऊन केवळ सामाजिक निधी प्रदान कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!