*कोकण Express*
*कनेडी बाजारपेठ येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांची भव्य प्रचार रॅली*
*कार्यकर्ते जनता यांनी रॅलीत घेतला उस्फूर्त सहभाग*
*कणकवली : प्रतिनिधी*
कनेडी बाजारपेठ येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांची भव्य प्रचार रॅली आज असंख्य कार्यकर्ते आणि जनतेच्या उपस्थितीत संपन्न झाली. कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह त्यात जनतेने घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरला.
सांगवे कनेडी बाजारपेठेत प्रत्येक निवडणुकीत आमदार नितेश राणे हे प्रत्येक व्यक्तीच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करतात यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने पायी चालत प्रत्येकाशी संपर्क साधला आणि आशीर्वाद घेतले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून आपल्याला तिसऱ्यांदा मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे अशी नम्र विनंती नितेश राणे यानिवजनतेला केली. भाजपच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून मतदान करावे असे आवाहन उमेदवार नितेश राणे यांनी केले.
यावेळी भाजपचे उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे सह सुरेश सावंत. सरपंच संजय सावंत उपसरपंच प्रफुल्ल काणेकर आदिंसह बहुसंख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.तसेच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जाणता असे मोठ्या संख्येने उपस्थित होते.