*कोकण Express*
*असलदे ग्रापंचायतचा “स्मार्ट ग्राम” म्हणून झाला गौरव…*
*कणकवली तालुक्यात प्रथम; ओरोस येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात झाला सन्मान….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आर.आर. पाटील तालूका सुंदर गाव योजने अंतर्गत त्यांच्या पूण्यतीथी दिन १६ फेब्रुवारी रोजी असलदे ग्रा.पं. ‘स्मार्ट ग्राम’मध्ये कणकवली तालुक्यात प्रथम आल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते सरपंच पंढरी वायंगणकर, ग्रामसेवक राजेंद्र सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे.
ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जि. प.अध्यक्ष समिधा नाईक, उप मुख्यकार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते. ९ गावांचा प्रत्येकी १० लाख देऊन सन्मान करण्यात आला.
कणकवली तालूक्यातील असलदे ग्रामपंचायतीचा समावेश असून या गावाचे तालूक्यातून अभिनंदन होत आहे.जिल्हा नियोजन सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात कुडाळ तालूका – कसाल, मालवण – मालोंड, देवगड – पावणाई, वेंगुर्ला- मठ, दोडामार्ग- कुंब्रल, कणकवली- असलदे, वैभववाडी- नावळे, सावंतवाडी येथील दोन गावांचा समावेश आहे.
यामध्ये न्हावेली व इन्सुर्ली असा गावांचा समावेश आहे. तर २०१९,२० या आर्थिक वर्षामध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार कणकवली तालूक्यातून ओटव गावाचा समावेश आहे.
कणकवली तालूक्यातील असलदे ग्रा.पं.चा १८,१९ याकरिता स्मार्ट ग्रामसाठी तालूक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या पुरस्कारामुळे असलदे गावाच्या विकासात हातभार लागणार आहे.तसेच एका नव्या पुरस्काराने मानाचा तुरा खोवला जात आहे.
त्याबद्दल सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी.सावंत तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व सहकारी यांचे सर्वच स्तरांतून अभिंनदन होत आहे.