*कोकण Express*
*मा.खास.नारायण राणे आणि आम.नितेश राणेंनी केले संजय मालंडकर कुटुंबियांचं सांत्वन*
*कणकवली: प्रतिनिधी*
माजी नगराध्यक्ष सायली मालंडकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेशजी राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी सायली मालंडकर यांचे पती संजय मालंडकर ,त्यांचा मुलगा व कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन करत धीर दिला .