*कोकण Express*
*परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा………….*
*वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन………*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले आहे.या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व पीडित पुजा हीच्या कुटुंबाला न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष भारती रावराणे, नगराध्यक्ष समिता कुडाळकर, भाजपा महिला पदाधिकारी प्राची तावडे, माजी सभापती शुभांगी पवार आदी उपस्थित होते.