*कोकण Express*
*महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ लोरे येथे गाव दौरा बैठक संपन्न*
*लोरे सरपंच विलास नावळे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव*
*कणकवली – प्रतिनिधी*
कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावत सुरु आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोरे येथे गाव दौरा बैठक संपन्न झाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद या गाव दौरा बैठकांना मिळत आहे. हाच प्रतिसाद संदेशभाई पारकर यांना येणाऱ्या 23 नोव्हेंबर ला विजयी करेल. आणि कणकवली विधानसभेतुन आपल्याला हक्काचा आमदार म्हणून संदेश पारकर विजयी होतील असा ठाम विश्वास यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी लोरे विभागप्रमुख व विद्यमान सरपंच विलास नावळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विलास नावळे यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, लोरे नंबर 1 चे माजी सरपंच राजू रावराणे, माजी जी प सदस्य दिव्या पाचकुडे,सभापती राजू रावराणे , नाना रावराणे, विनोद पेडणेकर, संजय सुतार, गुरुराज डोंगरे युवासेना उपतालुका प्रमुख, अनिल नराम, विकास मठकर, पप्या दळवी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.