कणकवली शिवसेना (शिंदे गट) इन्कमिंग सुरूच !!

*कोकण Express*

*कणकवली शिवसेना (शिंदे गट) इन्कमिंग सुरूच !!*

*कणकवली : प्रतिनिधी*

शिवडाव गावातील श्री.सुनील तुकाराम सावंत,विनीत गजानन सावंत,प्रज्योत जगन्नाथ सावंत,निखिल प्रकाश सावंत ,सचिन रमाकांत शेवाळे आदी कार्यकर्ते यांनी उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी त्यांनी सांगितले की महायुतीचे उमेदवार श्री.नितेश जी राणे साहेब यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

प्रवेशाच्युया वेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख श्री.मेहुल धुमाळे,महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत,देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू मॅडम,कणकवली उपतालुकाप्रमुख श्री. दामू सावंत,कणकवली महिला तालुका प्रमुख शोभा बागवे,प्रिया टेंबकर,देवगड महिला प्रमुख निता गुरव,स्वप्नाली वाल्मिकी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!