*कोंकण Express*
*मृत महिलेच्या कुटुंबियांचे बंदेनवाज खानी यांनी सांत्वन करून धोथरे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये धडक बसून झालेल्या अपघातात फातिमा रियाज धोथरे (३६, रा. उंबर्डे मेहबूबनगर) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या कुटुंबियांचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी दिले आहे.
यावेळी शशिकांत इंगळे, आरिफ काझी, आरिफ शेख, नासीर शेख, सोहेल चौगुले, आदिल चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.