*कोंकण Express*
*संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या येणार देवगडात..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या (ता. १७) देवगड येथे येत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ ते देवगड कॉलज नाका येथे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिली.
कणकवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन भगवे वादळ निर्माण केले. त्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वैभववाडीत सभा घेऊन महायुतीची पोलखोल केली. आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महायुतीच्या बेगडीपणाचा पोलखोल करणार आहेत. देवगड कॉलेज नाका येथे उद्या (ता. १७) सायंकाळी चार वाजता त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे.
संदेश पारकर म्हणाले की, कणकवली मतदारसंघात परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असून देखील इथल्या
आमदाराला विवकासाचे एकही काम करता आलेले नाही. तर जी विकास कामे सांगितली जातात ती केवळ टक्केवारी खाण्यासाठी सुरू
करण्यात आली. या कामांचा जनतेला शून्य उपयोग झाला आहे. कणकवलीचा कचरा प्रकल्प किंवा देवगडचे आनंदवाडी बंदर हे प्रकल्प
अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. फक्त या विकासकामांसाठी आलेला निधी स्वतःच्या खिशात घालण्याचे काम राणे करत आहेत. कणकवली
मतदारसंघातील प्रत्येक गावातून आपल्याला उत्फुर्त पाठिंबा मिळात आहे. उद्या देवगड येथील सभेला देखील मोठ्या संख्येने नागरिक
उपस्थित राहणार असल्याचे श्री. पारकर म्हणाले.