*कोकण Express*
*वारगांवचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपात परतले, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश*
*उबाठा मध्ये जाऊनही भ्रमनिरास, यामुळे परत भाजपात*
*आ. नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास*
*वारगाव चे राजकारण बदलणार*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विकास होईल म्हणून उबाठामध्ये गेलो खरे मात्र खोटी आश्वासने आणि फसवणूक या पलीकडे काहीही मिळाले नाही. असे कोकाटे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम केले आहे. त्यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांचा विकास केला, ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून, वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. असे कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित संतोष कानडे, दिलीप तळेकर मिलिंद मेस्त्री, संतोष पारकर, शिरसाट बुवा, उपस्थित होते