कोकण Express*
*खारेपाटण बंदरवाडी येथील नागरिकांनी संदेश भाई पारकर यांच्या उपस्थितीत केला उबाठा पक्षात प्रवेश..*
*कणकवली: प्रतिनिधी*
गेल्या दहा वर्षात येथे स्थानिक आमदाराने आमच्या बंदर वाडीचा कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही फक्त इलेक्शन पुरत्या भूलथापा मारल्या.कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या खारेपाटण गावाचा झाला नाही.त्यामुळे स्थानिक आमदाराला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही असा संकल्प करून इथल्या लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
तर सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा संदेश पारकर या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याचा निर्णय यावेळी येथील ग्रामस्थांनी घेतला.प्रवेश करणाऱ्यांमध्ये असरफ मुकादम, तेजस मुकादम,तेसिम मुकादम, यास्मिन मुकादम, फर्जना मुकादम, अब्दुल्ला मुकादम, अंजू ठाकूर, इरफान ठाकूर यांच्या सह अनेक स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.