*दोन बसमध्ये चिरडून महिला ठार*
*कणकवली बसस्थानकावरील घटना*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली बसस्थानकावर फलाटावर लागलेली एक बस आणि फलाटावरून सुटणारी एक बस अशा दोन बसेसच्या मध्ये चिरडून एक महिला ठार झाली.शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.
सदर महिला सुटणारी बस पकडण्यासाठी प्रयत्न करत होती.दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत असतानाच बस सुरू झाल्याने दोन्ही बसच्या मध्ये ही महिला चिरडली.या घटनेनंतर तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला बोलावून सदर अत्यवस्थ महिलेस उपजिल्हा रुग्णालय कणकवली याठिकाणी दाखल करण्यात आले.सदर महिलेच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता.तपासणीअंती सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस आणि एसटी चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.