कणकवली – ​२०२१-२२ साठी ​४५ कोटी ​९६ लाख ​३९ हजाराचे अंदाजपत्रक

कणकवली – ​२०२१-२२ साठी ​४५ कोटी ​९६ लाख ​३९ हजाराचे अंदाजपत्रक

*कोकण Express*

*कणकवली – ​२०२१-२२ साठी ​४५ कोटी ​९६ लाख ​३९ हजाराचे अंदाजपत्रक……*

​​*नगरपंचायतच्या विशेष बैठकीत अंदाजपत्रकास मान्यता!*

​​*कणकवली​ ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतच्या ​८२ लाख ​८७ हजाराच्या शिल्लकीच्या अंदाजपत्रकास नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. तर ​२०२१-२२ या वर्षासाठी कणकवली नगरपंचायतच्या विशेष बैठकीत ​४५ कोटी ​​​९६ लाख ​३९ हजार ​३५४ रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली.

गतवर्षी कणकवली नगरपंचायत​​चे अंदाजपत्रक सुमारे ​६४ कोटींचे होते. मात्र यावर्षी त्यातील सुजल निर्मल अंतर्गतच्या डी.पी.आर चे अंदाजीत​ ​​२५ कोटींची तरतूद बजेटमध्ये कट करण्यात आल्याने ​४५ कोटी ​९६ लाख ​३९ हजाराच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. कणकवली नगरपंचायत बजेटची बैठक नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प्रशासकीय अधिकारी किशोर धुमाळे, लेखापाल प्रियांका सोनसुरक, रुचिता ताम्हणकर, ध्वजा उचले तसेच नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते.

या बैठकीत कणकवली शहर विकासाच्या अनुषंगाने विविध हेडखाली तरतूद करण्यात आली असून, त्यात अग्निशमन, नळ योजना दुरुस्ती, कोंडवाडा, शहरातील विकास कामे, कणकवली नगरपंचायतचा पर्यटन महोत्सव अशा अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!