पाणबुडी आणि फिशिंग व्हिलेज प्रकल्प वेंगुर्लेतील पर्यटनाची दिशा बदलेल.

पाणबुडी आणि फिशिंग व्हिलेज प्रकल्प वेंगुर्लेतील पर्यटनाची दिशा बदलेल.

*कोंकण Express*

*पाणबुडी आणि फिशिंग व्हिलेज प्रकल्प वेंगुर्लेतील पर्यटनाची दिशा बदलेल…*

*दीपक केसरकर; उभादांडा येथे खळा बैठक, तेलींसह विशाल परंबावर टीका…*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

तालुक्यात झालेला नवाबाग फिशिंग व्हिलेज ४५ कोटी आणि वेंगुर्ला पाणबुडी १०० कोटी रुपयांचा प्रकल्प पर्यटनाची दिशा बदलणारा ठरणार आहे. विकास साधताना सिंधुरत्न योजनेतून आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदींच्या नेतृत्वाखाली

घरोघरी लक्ष्मीची पाऊले उमटतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी उभादांडा येथे बोलताना व्यक्त केला.

उभादांडा येथे आयोजित खळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य दादा कुबल, नितीन मांजरेकर, वसंत तांडेल, सुनील डुबळे, बाळा दळवी, हर्शद ढेरे, अमित गावडे, दिशा शेटकर, रमेश नार्वेकर, नयन पेडणेकर, मनवेल फर्नांडिस, देवा कांबळी आदी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले, महायुती एकजूट आहे. महायुतीचे सरकारने महिलांचे सबलीकरण योजना राबविल्या. लाडकी बहिण योजना आणल्या. एका रूपयांमध्ये विमा, शेतकरी, मच्छीमार, बागायतदार यांच्यासाठी योजना राबविल्या आहेत. नवाबाग फिशिंग व्हिलेज करतोय. मुंबई पालकमंत्री म्हणून बहुमान मतदारसंघाला भूषणावह आहे. मुंबई पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले. कोकणच्या संस्कृतीमुळे मिळालेली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटलो. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्रालयात लोकप्रिय काम करून दाखविले. सावंतवाडी संस्थानचे अधिपती बापूसाहेब महाराज यांनी रामराज्य केले ती संस्कृती जोपासली. जमिनी लुबाडणूक करून पैसे वाटप होतात तर दुसऱ्या मनीलॉड्रीग केली आहे.

केसरकर म्हणाले, उभादांडा मंगेश पाडगांवकर कवितांचा गाव, नवाबाग फिशिंग व्हिलेज, पाणबुडी असे मोठं मोठे प्रकल्प मंजूर केले आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी झटलो. सुमारे २५ शे कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे केली. आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा दिला. सिंधूरत्न योजनेतून आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत केली. कवी मंगेश पाडगांवकर, क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांचे उभादांडा गाव आहे. या गावाचा नावलौकिक वाढवावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई सह महाराष्ट्रात वेगवान विकासासाठी विविधांगी प्रकल्प हाती घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकप्रिय योजना राबविल्या आणि सर्वांगीण विकास साधला. गृहराज्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तुमच्या आशिर्वादामुळेच विजयी झालो. मुंबई पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले. या मतदारसंघात विकासाची गंगा आणली.

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात मंजूर करण्यात आलेली कामे आपण करणार म्हणून विरोधक सांगत आहेत तर दुसऱ्या उमेदवारांने मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडले असा नाव टाळत राजन तेली व विशाल परब यांच्यावर टीका केली. सावंतवाडी दिपक केसरकर, कुडाळ निलेश राणे व कणकवली नितेश राणे विजयी व्हावेत असे ते म्हणाले.

रेडी, शिरोडा, आरवली, सागर तीर्थ, आसोली, पाल, अणसूर येथील भेटीत दिपक केसरकर यांनी आवाहन केले.

जिल्हा परिषद माजी सभापती दादा कुबल, दिपक केसरकर मतदार संघात निधी आणतात. पर्यटन पाया मजबूत केला आहे. आता पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. ते विजयी झाल्यानंतर मंत्रीमंडळात स्थान मिळेल आणि सर्वांगीण विकासाचे व्हिजन पूर्ण करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!