*कोंकण Express*
*महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा डिगस येथे शुभारंभ…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ डिगस गावातील ग्रामदेवता आईकाळंबा देवी चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब, शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ ठेवून आई कालिका मातेला साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित कुडाळ खरेदी विक्री संघ संचालक विनायक अणावकर, माजी सरपंच रमेश घोगळे, नारायण सावंत, भाजपा बुथप्रमुख राम परब, विजय लुडबे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निखिल कांदळगावंकर, विद्यमान उपसरपंच भिकाजी पाताडे, माजी उपसरपंच भगवान घाडी, युवा मोर्चा सरचिटणीस जयेश चिंदरकर, शक्तीकेंद्र प्रमुख महेश पालव, गजानन सुर्वे, पांडुरंग सावंत, उदय घोगळे, सचिन सावंत, निलेश गावडे, अजित पवार, अभिनंदन चव्हाण, दीपक परब, सागर लुडबे, कृष्णा परब, तनिष चोरगे, योगेश सावंत, दीपक शेडगे, सदानंद निकम, अविनाश गायकवाड, गणेश गायकवाड, सुरज जाधव, गोपाळ तावडे, बाळू घोगळे, संजय कदम, राजन खांडेकर, विशाल घोगळे, पूनम राणे, मेघना राणे आदी शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.