*कोंकण Express*
*अर्चना घारे; एक मत देऊन मतदारसंघ योग्य हातात देण्याचे आवाहन…*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
महिला उमेदवार उभी राहिल्याने विरोधी उमेदवारांना धडकी भरली आहे. मी कोकणी मुलगी आहे, मोडेन पण वाकणार नाही. तुमच्या मागण्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. मला तुमचं एक मत देऊन मतदारसंघ योग्य हातात द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी केले.
केळुस-कालवेबंदर येथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी योगेश कुबल, दीपिका राणे, विक्रांत कांबळी, विशाल बागायतकर, अवधूत मराठे, विठोबा टेमकर, सुहास मोचेमाडकर, आदिती चुडजी, कुणाल बिडीये, वनिता मांजरेकर, रिया धुरी, शुभम नाईक, सुनिता भाईप, प्रशांत बागायतकर, विवेक गवस आदी उपस्थित होते.
सौ. घारे पुढे म्हणाल्या, कोकणी माणूस हा मनाने श्रीमंत आहे. मात्र आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. हीच संधी आहे मला फक्त तुमचे एक मत द्या, उर्वरित आयुष्य मी लोक सेवेसाठी देईन. मागील सात-आठ वर्षे मी काम करते. वाड्यावस्त्यांवरील प्रश्न मी ऐकते आहे. मागील काही दिवसात एका वेगळ्याच प्रकारचे राजकारण झाल्याने मला माझ्या हक्काचे तिकीट मिळाले नाही मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला. तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा मी तुमच्यासाठी उभी राहीन, असं ठाम विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.