*कोकण Express*
*स्मार्ट ग्राम मध्ये कणकवली तालूक्यात असलदे ग्रा. प. प्रथम*
*ओरस येथे पुरस्कार वितरण सोहळा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर आर (आबा)पाटील यांच्या स्मृतिदिनी तालूका सुंदर गाव योजने अंतर्गत १६ फेब्रुवारी रोजी असल्याने या दिवशी जिल्हास्तरावरून मान्यवर मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते सिंधुदूर्ग जिल्हयातील २०१८/१९ या आर्थीक वर्षाकरीत निवड झालेल्या ९ गावांचा सन्मान उद्या ओरस येथे होणार आहे. यात कणकवली तालूक्यातील असलदे ग्रामपंचायतीचा समावेश असून या गावाचे तालूक्यातून अभिनंदन होत आहे.जिल्हा नियोजन सभागृहामध्ये उद्या सकाळी ११ वा.हा पुरस्कार सोहळयाचे वितरण होणार असल्याचे संबधीत ग्रा.पं.ना कळविले आहे.
यात पुढील प्रमाणे तालूका वाईज गावांचा समावेश आहे कुडाळ तालूका – कसाल,मालवण –मालोंड ,देवगड-पावणाई, वेंगुर्ले मठ,दोडामार्ग-कुंब्रल ,कणकवली- असलदे,वैभववाडी-नावळे,सावंतवाडी येथील दोन ग्रा प चा समावेश आहे. यामध्ये न्हावेली व इन्सुली या गावांचा समावेश आहे.तर २०१९/२० या आर्थीक वर्षामध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार कणकवली तालूक्यातून ओटव गावाचा समावेश आहे.
कणकवली तालूक्यातील असलदे ग्रा.पं.चा १८/१९ याकरिता स्मार्ट ग्रामसाठी तालूक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून या पुरस्कारचे वितरण उद्या संपन्न होत असल्याने सरपंच पंढरी वायंगणकर , उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी.सावंत तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व सहकारी यांचे अभिंनदन होत आहे.