*कोंकण Express*
*होय, आम्ही स्थानिक ठेकेदरांच्या बाजूनेच उभे राहणार !*
*काय ते व्हायरल करा मात्र अर्धवट नको पुर्ण करा*
*ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी भाजपा कुडाळ मालवण संयोजक बाबा परब यांचे विरोधकांना आव्हान*
*मालवण | प्रतिनिधी*
आम्ही स्थानिक ठेकेदरांच्या बाजूनेच कायम उभे राहणार आहोत. विरोधकांनी काय ते व्हायरल करा मात्र अर्धवट नको पुर्ण करा. मोबाईल संभाषण ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी भाजपा कुडाळ मालवण संयोजक बाबा परब यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील ठेकेदारांना गेली दहा वर्षे अभय देऊन भ्रष्टाचाराचा चिखल ज्यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात केला. त्या वैभव नाईक यांचे जिल्ह्याच्या बाहेरील ठेकेदारांवर जास्तच प्रेम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
येथील विकासकामे ही स्थानिक ठेकेदारांना मिळावीत ही आमची भुमिका असताना वैभव नाईक आणि त्यांचे बगलबच्चे जिल्ह्याबाहेरील ठेकेदारांना कामे भरण्यास सांगत असल्याने त्याला अटकाव करण्याचे काम आम्ही केले. होय आम्ही मान्य करतो आम्ही स्थानिक ठेकेदारांच्या बाजूनेच राहणार. त्यांनाच कामे मिळावीत हीच आमची भुमिका कायम राहील. म्हणूनच वैभव नाईक यांच्या ठेकेदारांना आम्ही भराणा केलेले ठेके मागे घ्या हे सांगितलेच. मात्र त्या संभाषणाचा काही भाग व्हायरल करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम वैभव नाईक आणि त्यांचे बगलबच्चे करत आहेत. मात्र यातून साध्य काही होणार नाही. कारण आमची भुमिका बाहेरील ठेकेदार नको स्थानिक ठेकेदार यांनाच काम मिळावे हीच कायम राहील. त्यामुळे एखादी अर्धवट ऑडिओ क्लिप व्हायरल करून पाठ जास्त थोपटून घ्याल तर स्वतःची पाठ स्वतःच फोडून घ्याल, वैभव नाईक यांनी डाके व अन्य जिल्ह्याबाहेरील ठेकेदार यांच्या माध्यमातून अनेक वर्षे जिल्ह्यात डाका टाकला. उबाठा गटाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. बाहेरील ठेकेरांची तळी उचलणे थांबवा. तुमचे सतीश नाईक ठेकेदार आहेत. ते स्थानिक आहेत आमचा त्यांना विरोध नाहीच मात्र बाहेरील ठेकेदार आले तर आमची भुमिका विरोधाचीच राहील. त्यांना विरोध दर्शवलेल्या ऑडिओ क्लिप हव्या असतील आम्हीच करून पाठवतो. मात्र स्वतःच तोंडावर आपटण्याचे बालिश खेळ उबाठा वाल्यानी थांबवावेत.
यां सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुक लक्षात घेता निलेश राणे यांना जनतेतून मिळतं असलेला प्रतिसाद पाहता कुठेतरी निलेश राणे यांची बदनामी व्हावी या हेतूने कुठेतरी त्यांचे नाव जोडून काहीना काही प्रयत्न वैभव नाईक यांच्याकडून सुरु आहे. स्वतःचा पराभव दिसू लागल्यामुळे हे सगळे प्रकार सुरु आहेत. कारण वैभव नाईक यांना जनता कंटाळली आहेच सोबत त्यांचेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी ही त्यांची साथ सोडत आहेत. गेल्या काही दिवसात मालवण कुडाळ मतदारसंघात अनेक पक्षप्रवेश भाजपा शिवसेना पक्षात झाले आहेत. निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होत असलेले हे प्रवेश पाहून पराभव निश्चित झाल्याने वैभव नाईक यांचे बालिश खेळ सुरु झाले आहेत. आगामी काळात माजी आमदार म्हणून हेच खेळ आपण खेळावेत. कुडाळ मालवणच्या विकासाची जबाबदारी निलेश राणे समर्थपणे पुर्ण करतील हा जनतेचा विश्वास आहे. आम्ही कार्यकर्ते अजून जोमाने काम करू,
तूर्तास एवढेच सांगतो,, मात्र लवकरच वैभव नाईक आणि उबाठाचे काही कारनामे उघड केले जातील. त्याची आतुरता वैभव नाईक आणि त्यांच्या बगलबच्चानी ठेवावी. असेही
भाजपा कुडाळ मालवण संयोजक बाबा परब यांनी प्रसिद्धी पत्रातून स्पष्ट केले.

