*कोकण Express*
*मुंबई – गोवा महामार्गावरून जणाऱ्या वाटसरुंची भागणार तहान….*
*वागदेत पाणपोईचा शुभारंभ ; सामाजिक कार्यकर्ते वैभव काणेकर यांचा पुढाकार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वागदे येथे सामाजिक कार्यकर्ते वैभव काणेकर यांचा पुढाकाराणे कायमस्वरूपी पाणीपोई उभारली आहे. तर एखाद्याला पाणी पाजणे हे पुण्याचं काम आहे, श्री. काणेकर यांनी पाणीपोई उभारून केलेले काम कौतुकास्पद असून या सार्वजनिक पाणपोईमुळे मुंबई – गोवा महामार्गावरून जणाऱ्या वाटसरुंची तहान भागणार आहे. हायवे चौपदरीकरणात हायवेलगत असलेली अनेक घरे विस्थापित झाली. त्यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गास या पाणपोईचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन वागदे गावचे माजी उपसरपंच श्रीधर घाडीगांवकर यांनी केले.
कै. सुदेश काणेकर, कै. सुरेंद्र काणेकर, कै.कु.विजया काणेकर यांच्या स्मरणार्थ माघी गणेशजयंतीचे औचित्य साधतत गणेश मंदिर शेजारील जागेत हि मोफत पाणपोई उभारण्यात आली आहे.
यावेळी सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, चंदन काणेकर, वैभव काणेकर, सतीश काणेकर, परेश काणेकर, सचिन ताटे, संगीता देसाई, आशिष काणेकर, बाबा घाडीगांवकर आदी उपस्थित होते.