*कोकण Express*
*पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा*
*कणकवली भाजपा शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचा नाव येत आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तरच पुजा चव्हाण या पिडीतेला न्याय मिळेल. अशी मागणी कणकवली तालुका भाजपाच्या वतीने कणकवली पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कणकवली भाजपा शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांना दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, पंचायत समिती सदस्य सुजाता हळदीवे, नगरसेवक शिशीर परुळेकर, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, संजना सदडेकर, मनाली गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.