*कोकण Express*
*कणकवली उपसभापती दिव्या पेडणेकर यांचा राजीनामा*
▪️ *नूतन उपसभापतीपदी कोणाची वर्णी ? ; प्रकाश पारकर ,मिलिंद मेस्त्री यांची नावे चर्चेत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पं स च्या उपसभापती दिव्या पेडणेकर यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पक्षीय धोरणानुसार सभापती मनोज रावराणे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.
दिव्या पेडणेकर यांनी पक्षीय धोरणानुसार आपला राजीनामा दिला आहे. रिक्त उपसभापती जागी कोणाची वर्णी लागते याची सर्वानाच उत्सुकता आहे. उपसभापतीपदासाठी दोन नावे जोरदार चर्चेत आहेत. कासार्डे मतदारसंघाचे पं स सदस्य प्रकाश पारकर आणि ओसरगाव पं स मतदारसंघाचे पं स सदस्य मिलिंद मेस्त्री यांची नावे आघाडीवर आहेत. पं स सभागृहात जेष्ठ असलेले आणि माजी जि प सदस्य राहिलेले प्रकाश पारकर हे राणेंशी एकनिष्ठ आहेत. तर भाजपा शहर मंडल अध्यक्ष असलेले मिलिंद मेस्त्री हे आमदार नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात पं. स.उपसभापतीपदाची माळ पडते याची सर्वानाच उत्सुकता आहे.