*कोंकण Express*
*रविवार दि.१० नोव्हेंबर गोपुरी आश्रमात सुरू होणार जीवन शिक्षण शाळा*
येत्या रविवारपासून गोपुरी आश्रमात सुरू होणार जीवन शिक्षण शाळा.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना जन्म देणे सोपे आहे. परंतु त्यांचे भावविश्व सांभाळत यांचे बालपण आनंदी बनवून त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व बनवने हे पालकांसमोर आव्हान उभे आहे.
या संदर्भाचा विचार करून भविष्यात भावनिक, वैचारिक व संस्काराच्या दृष्टीने सक्षम पिढी घडावी म्हणून गोपुरी आश्रमाने ‘जीवन शिक्षण शाळेचा’ प्रयोग मांडला आहे. या प्रयोगाचे उद्घाटन अप्पासाहेब पटवर्धन यांच्या जयंती दिनी ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
रविवारी १० नोव्हेंबर, २०२४ ला या शाळेला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. ही शाळा प्रत्येक महिन्यातील ‘रविवारी’ घेण्यात येणार आहे. मुलांच्या कलानुसार त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून भविष्यात सक्षम पिढी घडावी असा गोपुरी आश्रम परिवाराचा प्रयत्न आहे.
कणकवली व कणकवली परिसर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकानी आपल्या पाल्याच्या सक्षम विकासासाठी या शाळेचा लाभ घ्यावा असे गोपुरी आश्रमातर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9404940217/9421235839 या नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आव्हान करण्यात आले आहे.