राणे व राऊत वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा

राणे व राऊत वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा

*कोकण Express*

*राणे व राऊत वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा…..*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यानुषंगाने कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडून आंदोलनात सक्रिय असणाऱ्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्यामुळे या दरम्यान आंदोलने, मोर्चा अशा माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये या दृष्टीने या नोटिसा देण्यात आल्या असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच कणकवली शहरातील पोलिस बंदोबस्तही काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!