*कोंकण Express*
*देवगड तालुक्यातील चांदोशी गावात संदेश पारकर यांची जोरदार प्रचार सूरू!*
*देवगड वासियांचा निर्धार सर्वसामान्य हाकेला धावून येणाऱ्या संदेश पारकर यांच्या पाठीशी उभे राहणार!*
*देवगड : प्रतिनिधी*
तालुक्यातील चांदोशी गावात पिटुशेठ आचरेकर आणि विजय घाडी त्यांच्या घरी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिली सदिच्छा भेट घेतली.
चांदोशी गावातील धुरीवाडी आणि घाडीवाडी येथून संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
गेल्या 10 वर्षात येथील स्थानिक आमदाराने आमच्या भागाचा कोणताच विकास केला नाही .त्यामुळे येत्या विधानसभेला त्याला या प्रभागातून कोणीही मतदान करणार नाही. असा ठराव येथील ग्रामस्थांनी केला.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या संदेश पारकरांनसारख्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे येथील ग्रामस्थांनी संकल्प केला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पिंटू शेठ आचरेकर, सलमान खान, प्रणय चांदोस्कर, विश्वनाथ मेस्त्री, आरती धुरी, बाबू धुरी, सुरज गाडी, जॉली तेली आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

