महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

*कोंकण Express*

*महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन*

*मालवण | प्रतिनिधी*

कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन मालवण शहरातील मेढा दैवज्ञ भवन नजीक येथे माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आर पी आय (आठवले गट) महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले या कार्यालयाची विजयाची ख्याती आहे. या निवडणुकीतही ति दिसून येईल. प्रत्येक बूथवर मोठी आघाडी असेल. महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. तर येथील आमदार दहा वर्षात निष्क्रिय ठरला असे सांगत खा. नारायण राणे यांनी येथील समस्यांना पाढा वाचला.

यावेळी निलेश राणे म्हणाले महायुती जोमाने काम करत आहे. ही ताकद मोठा विजय निश्चित करणारी आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. मोठया विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, राजन गांवकर, आबा हडकर, अभय कदम, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, पेडणेकर, राकेश सावंत, अमित गावंडे, महेश गांवकर यांसह भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, भाजप महायुतीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर महेश राणे भाजप मालवण तालुकाअध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!