पियाळीतील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण कुडतरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल ; उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

पियाळीतील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण कुडतरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल ; उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

*कोंकण Express*

*पियाळीतील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण कुडतरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल ; उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती*

*पक्षाध्यक्ष शरद पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या विश्वासावर राष्ट्रवादीत दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यातील पियाळी गावठाण येथील प्रगतशील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक प्रवीण प्रभाकर कुडतरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी ……उपस्थित होते.पक्षाध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्याचे अध्यक्ष आमची सामंत कणकवली तालुका अध्यक्ष श्री अनंत पिळणकर यांच्यावर विश्वास ठेवून आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला. राज्यात सत्ता नसताना आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुडतरकर यांचा प्रवेश हा सकारात्मक क्षण आहे. कणकवली मतदारसंघात भाजपाचा बलाढ्य उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार नसताना सुद्धा सर्वसामान्य माणसांचा कल हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. हे दिसून येते.माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे जो त्यांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. प्रवीण प्रभाकर कुडतरकर यांचे मनापासून पक्षात स्वागत करतो. तसेच त्यांची कणकवली उप तालुका प्रमुख पदावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या आदेशाने मी आज नियुक्ती करत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा देत असल्याचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!