*कोंकण Express*
*महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा बोर्डवे गावात घरोघरी प्रचार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील बोर्डवे गावात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घरोघरी जाऊन भेट घेत, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा केली. मला एकदा संधी द्या, आपल्या गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र मेहनत करीन, असा विश्वास यावेळी संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोर्डवे गावातील मोराई देवी, श्री. कालिका देवी मंदीरात जावूया दर्शन घेतले.
यावेळी उ.बा. ठा. शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख शरद साळवी, जेष्ठ कार्यकर्ते संतोष येंडे, बोर्डवे ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड, युवासेना शाखाप्रमुख स्वप्निल शिंदे, नरेश येंडे, सुंदर साळवी, विनोद परब, अशपाक शेख, कुतुब शेख, मोहसिन शेख, आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.