*कोंकण Express*
*कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांच्या रॅलीत लोटला जनसागर*
*हजारोंची गर्दी,ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी*
*महाजनसागराच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज*
*महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे ते तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे ,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे.या रॅलीने आम.नितेश राणे जावून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीदेव गांगो मंदिरात देवतेला श्रीफळ देऊन रॅली ची सुरुवात करण्यात आली. भाजप नेते नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, सौ नीलम ताई राणे सौ नंदिता राणे सौ प्रियंका राणे कुमार अभिराज राणे कुमार निमित राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत यांच्या हजारो प्रमुख पदाधिकारी आणि जनसागराच्या उपस्थितीत ही रॅली रवाना झाली.