मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांचे वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांचा 16 फेब्रुवारी रोजी चतुर्थ स्मृतिदिन

मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांचे वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांचा 16 फेब्रुवारी रोजी चतुर्थ स्मृतिदिन

*कोकण Express*

*मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांचे वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांचा 16 फेब्रुवारी रोजी चतुर्थ स्मृतिदिन*

*चतुर्थ स्मृती दिनाचे औचित्य साधून१६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*सिंधुदुर्ग*

मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांचे वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त- मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी गणेश कदम यांच्या तर्फे ओसरगाव कांनसळी वाडी प्राथमिक शाळा व ओसरगाव मळी वाडी प्राथमिक शाळेस शाळांनी केलेल्या मागणी नुसार अद्यावत ट्रॉली स्पिकर देण्यात येणार आहे. तसेच ओसरगाव बौद्ध वाडी शाळेतील मुलांना शालेय वस्तूंचे तसेच सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाचे आयोजन मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम, राघोजी कदम, आप्पा देसाई, प्रदीप तळेकर, बबन देसाई, दिलीप तळेकर, भानुदास तळेकर, सौ.भावना तळेकर, सौ.स्नेहा कावले, मधू कावले, दीपक धुरी, श्याम चव्हाण, श्याम गवस तसेच बाळ गोपाळ प्रासादिक भजन मंडळ, ओसरगाव यांच्या मार्फत केले जाणार आहे.


गणेश कदम यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्या साठी मोठे सामाजीक योगदान आहे. त्यांनी वाढीव वीज बिलाने त्रस्त सिंधुदुर्ग वासीयांनसाठी मोठ्या प्रमाणात मोफत सोलर लाईट लावाल्या आहेत. शाळा डिजिटल केल्या आहेत, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली आहे. अश्या प्रकारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आपल्या वडीलांच्या चौथ्या स्मृतिदिना निमित्ताने विविध शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम राबवून समाज्यापुढे आदर्श ठेवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!