*कोंकण Express*
*कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार*
कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथील प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
या प्रसंगी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच महायुतीचे घटकपक्ष भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल प्रक्रियेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.