*कोंकण Express*
*कोकणातून काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहे*
*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकासा आघाडीला सणसणीत टोला*
*दिल्लीत काँग्रेस नेत्यांसमोर चर्चेत असलेल्या जागांवर उबाठा चे एबी फॉर्म वाटप*
*उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होणार नाहीत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस ला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठा च्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत ते काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणा मधून तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटप मध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत.जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत त्यातले किती जगा काँग्रेस ला द्यायचे ठरले होते हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिक पने जाहीर करावे. आज काँग्रेस ला कोकणातून उद्धव ठाकरे ने भुईसपाट केले आहे संपून टाकलं आहे.याचा काँग्रेस ने विचार केला पाहिजे.जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेस ला झुकते माप का नाही असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता.त्याच काय झालं.आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुख्या धमक्या देतो का.आतां कुठे गेले ते मांजर. २३ नंतर वरळी मद्ये आदित्य ठाकरे आमदार नसणार.त्याच्या मागे माजी आमदार लागणार. बाळासाहेब ठाकरे असताना सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे आता गेल्या पाचवर्षात तुमची 10 जनपथ ची मम्मी आणि राहुल गांधी मातोश्रीवर एकदा तरी आलाय का ? त्याला मातोश्रीचा पत्ता माहित आहे का ? असा सवाल केला.आमदार नितेश राणे यांनी केला.