*कोंकण Express*
*कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत एबी फॉर्म सुपूर्त करण्यात आला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर मान्यवर उपस्थित होते