*कोंकण Exspress*
*भविष्यात आपल्या मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी आम्ही प्रयत्नशील : नारायण राणे*
*कुडाळ : प्रतिनिधी*
महायुतीचा मेळावा संप्पन होत आहे.या मेळाव्यात निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होत असून ही निवडणूक वीस तारखेला होणार. ही निवडणूक अती महत्वाची आमच्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे .या जिल्ह्यात मला अत्याधुनिक कारखाने आणायचे आहेत.
दोडामार्ग ला पाचशे कारखाने आणणार आणि येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण वर्गाला रोजगार देणार आपल्या जिल्ह्यातील तरुण पिढी वर्ग रोजगारासाठी बाहेर जाऊ नये आपल्या जिल्ह्यात त्यांना रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणूनच मी आपल्या जिल्ह्याचा विकास करणार आहे.मी या जिल्ह्यात काय आणले नाही मेडिकल कॉलेज ,शाळा, रस्ते,हे सर्व आणले. भविष्यात आपल्या मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी आम्ही प्रय्नशील आहे.
राजन तेली यांनी काय केलं मी त्याला आमदार केलं. सगळीकडे त्याची घरे आहेत. कशी आहेत? कॉन्ट्रॅक्ट र कडून कमिशन घ्यायचं. सगळ्यांना लुटायचा. वैभव नाईक ने कुडाळ, मालवण या मतदार संघात काय काम केलं. काही विकास नाही केला . कधी आपल्या मतदार संघाचा विकास केला नाही.
शिवसेना वाढायला आणि महाराष्ट्रात पोहचायला नारायण राणे व एकनाथ शिंदे याच्यासारख्या शिवसैनिकामुळे हा राणे जन्मला नसता तर तेली दिसलाच नसता आज ठाकरे सोबत जाऊन माझ्यावर टिका करत आहे. हा शेमडा आणि उद्धव ठाकरे महाशेमडा अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली..