भाजपाच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत मत्स्य महोत्सवानिमित्त आयोजित “मत्स्य चित्रकला” स्पर्धेचा शुभारंभ

भाजपाच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत मत्स्य महोत्सवानिमित्त आयोजित “मत्स्य चित्रकला” स्पर्धेचा शुभारंभ

*कोकण Express*

*भाजपाच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत मत्स्य महोत्सवानिमित्त आयोजित “मत्स्य चित्रकला” स्पर्धेचा शुभारंभ….*

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आलं उद्घाटन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

भाजपाच्याआत्मनिर्भर अभियानांतर्गत मत्स्य महोत्सवानिमित्त आयोजित “मत्स्य चित्रकला” स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आला.यावेळी या स्पर्धेत चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.सावंतवाडी नगरपालिका आणि निलक्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचा शुभारंभ काल करण्यात आला.दरम्यान पहिल्याच दिवशी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तर आजच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मत्स्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी सिंधु आत्मनिर्भर अभियानचे संयोजक अतुल काळसेकर,ज्येष्ठ चित्रकार दादा मालवणकर,आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर,राजू राऊळ,उदय नाईक,बंटी पुरोहित, विनोद सावंत आदी उपस्थित होते._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!