*कोंकण Express*
*शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर*
*जिल्ह्यातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा..*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे दरम्यान जाहीर केली आहे.ह्यात जिल्हा सचिव पदी निवारा बांधकाम कामगार सेनेचे मंगेश चव्हाण (माणगाव), जिल्हा संघटक पदी रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर (पिंगुळी),संपर्क प्रमुख सतीश सदाशिव कदम(मालवण), समन्वयक एकनाथ सावंत (सावंतवाडी), सह समन्वयक बापू वरक (मालवण) यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कामगार क्षेत्रात फोपावलेल्या परप्रांतीय कामगारांच्या अतिक्रमणाला आळा घालणे, कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने न्याय्य मागण्या व कामगार कायद्याचे संरक्षण मिळवून देणे,शासनाकडील कल्याणकारी प्रलंबित योजना, घरेलू असंघटित कामगारांचे प्रश्न आदी घटकांवर सेनेच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेच्या बॅनरखाली आलेल्या तीनही संघटनांचे जिल्ह्यात 10 ते 12 हजार हुन अधिक सदस्य असल्याने आगामी निवडणूकांमध्ये शिवसेनेला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यातील कष्टकरी कामगार वर्ग महायुती सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे.